World Heart Day 2021: जागतिक हृदय दिन

66 / 100

World Heart Day 2021: जागतिक हृदय दिन

हृदयरोग व पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास नागरिक आपल्या जीवनशैलीत आवश्यक सकारात्मक बदल घडवू शकतात. परिणामी, हृदयरोग, पक्षाघात , मधुमेह, उच्च रक्तदाब अशा असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होऊ शकेल.

World Heart Day 2021: जागतिक हृदय दिन

यासाठी जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयरोग आणि त्याच्याशी संबंधित जोखमीच्या घटकांबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई महापालिकेमार्फत बुधवारपासून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच असंसर्गजन्य आजारविषयक भ्रमणध्वनी सर्वेक्षण केले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार हृदयरोगामुळे मृत्यू पावणार्‍या व्यक्तींचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या २७ टक्के इतके आहे.

जन्म-मृत्यू नोंदणी आकडेवारीनुसार मुंबईत २०१९ मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी २९ टक्के इतके मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व पक्षघात या तीन आजारांमुळे झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना हृदयरोग व पोषक आहाराचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.

हृदयाशी संबंधित आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात २९ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक हृदय दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हृदयाचे आरोग्य सुस्थितीत राखण्याकरीता नागरिकांना प्रोत्साहित करण्यासह हृदयरोगांकरीता प्रतिबंध व नियंत्रण यासाठी आवश्यक उपाययोजनाबाबत जनजागृती केली जाते. पालिकेमार्फत पोस्टर व समाज माध्यमांवर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तिंपैकी ६४.६ टक्के व्यक्ती असंसर्गजन्य आजाराने बाधित होते, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे असंसर्गजन्य आजार व त्याकरीता कारणीभूत जोखमीचे घटक यांचे मूल्यमापन करण्यासाठी जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून ‘असंसर्गजन्य आजारविषयक भ्रमणध्वनी सर्वेक्षण’राबविण्यात येणार आहे.

या मोहीमेदरम्यान नागरिकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला जाईल. त्यात आहार विषयक सवयी, मधुमेह, उच्च रक्तदाब, तंबाखूसेवन, मद्यपान यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले जाणार आहेत.

८०००४००३०२१ या क्रमांकावरून आलेल्या दूरध्वनीला प्रतिसाद देऊन या आरोग्य सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

१८ वर्षांवरील पाच हजार ९५० इतक्या निवडक नागरिकांचे तीन टप्प्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. आरोग्य विषयक प्रश्न विचारणे, वजन, ऊंची व कमरेचा घेर तपासणे आणि रक्त व लघवी चाचणी करणे, अशा तीन टप्प्यांमध्ये हे सर्वेक्षण केले जात आहे.

Leave a Comment