महाराष्ट्र राज्यात सुरुवातीपासून वेगवेगळ्या विषयांसाठी स्वतंत्र महामंडले स्थापन केली गेली. या महामंडळांने राज्याच्या सर्वांगीण विकासात अत्यंत महत्वाचे योगदान आहे. ही सर्व महामंडळे खालील प्रमाणे आहेत.
कोण कोणती महामंडळे आहेत ?
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) महामंडळे
- स्थापना – 1960,
- मुख्यालय मुंबईयाची
- मुळ सुरुवात 1948 ला बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन म्हणून झाली.
- 1960 ला त्याचे MSRTC त रुपांतर झाले.
- हे महाराष्ट्रात प्रवासी व पार्सल वाहतूक सेवा देते.
- महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (MSEB)
- स्थापना 1960,
- मुख्यालय मुंबई
- विद्युत निर्मिती व पुरवठा यासाठी कार्यरत होते.
- जून 2005 मध्ये या महामंडळाचे कामकाजाच्या सोईसाठी चार वीज कंपन्यात विभाजन केले गेले.
- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (MSWC)
- स्थापना 1957,
- पुर्नरचना – 1962,
- मुख्यालय पुणे
- महाराष्ट्रात शेतमाल व इतर माल साठविण्यासाठी वखारी व गोदामे बांधते.
- महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
- स्थापना 1962,
- मुख्यालय मुंबई
- औद्योगिक वसाहती विकसित करते.
- महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC)
- स्थापना – 1962,
- मुख्यालय मुंबई
- लघुउद्योगांच्या विकासासाठी कार्य करते.
- त्यांना कच्चा माल पुरविते. लघुउद्योग हे मराठी मासिक चालविते.
- महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ/महावित्त (MSFC) महामंडळे
- स्थापना 1966,
- मुख्यालय – मुंबई
- लघु व मध्यम उद्योगांना कर्जपुरवठा करते.
- महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ (MSKVIB)
- स्थापना 1962,
- मुख्यालय मुंबई
- राज्यातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्य करते.
महामंडळे स्थापना व कार्ये
- महाराष्ट्र राज्य कृषीउद्योग विकास महामंडळ मर्यादित (MAIDCL Ltd)
- स्थापना 1965,
- मुख्यालय मुंबई
- कृषी प्रक्रिया उद्योगांच्या व इतर कृषी उद्योगांच्या विकासासाठी कार्य करते.
- महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणूक महामंडळ मर्यादित (SICOM Ltd)
- स्थापना 1966,
- मुख्यालय मुंबई
- महाराष्ट्रात औद्योगिक गुंवणूक वाढविण्यासाठी कार्य करते.
- महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित/महावस्त्र (MSTC Ltd)
- स्थापना 1966,
- मुख्यालय मुंबई
- वस्त्रोद्योग विकासासाठी कार्य करते.
- मराठवाडा विकास महामंडळ (MVM)
- स्थापना 1967,
- मुख्यालय औरंगाबाद
- मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्नशील.
- शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित (CIDCO Ltd)
- स्थापना 1970,
- मुख्यालय मुंबई
- नियोजन, गृहनिर्माण, औद्योगिक विकास यासाठी कार्यरत.
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB)
- स्थापना 1970,
- मुख्यालय मुंबई।
- प्रदूषण नियंत्रणासाठी कार्य करते.
- महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित (MSHC Ltd)
- स्थापना 1971
- मुख्यालय नागपूर
- हातमाग उदयोगाच्या विकासासाठी कार्य करते.
महत्त्वाची अर्थविषयक माहिती 2021
- महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित (MSCTDC Ltd)
- स्थापना (1972
- मुख्यालय नाशिक
- आदिवासींच्या लघु व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देते, मदत, मार्गदर्शन करते.
- महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ मर्यादित (MSMC Ltd)
- स्थापना 1973,
- मुख्यालय नागपूर
- महाराष्ट्रात खाणींचा विकास करणे व खनिजोत्पादन वाढविण्यासाठी कार्य करते.
- महाराष्ट्र चर्मोद्योग विकास महामंडळ (LIDCOM)
- स्थापना 1974,
- मुख्यालय मुंबई
- चर्मोद्योगांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे .
- महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित (MSPHC Ltd)
- स्थापना – 1974,
- मुख्यालय मुंबई
- राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना गृहबांधणीस सहाय्य व त्यांच्या कल्याणासाठी मदत करते.
- महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित (FDCM Ltd)
- स्थापना 1974,
- मुख्यालय नागपूर
- महाराष्ट्रात वनविकासासाठी कार्य करते.
- महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळ/माविम
- स्थापना 1975,
- मुख्यालय मुंबई
- महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी कार्य करते.
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC)
- स्थापना 1975,
- मुख्यालय मुंबई
- महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देते. पर्यटन विकासासाठी कार्य करते.
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ/महाबीज (MSSC Ltd)
- स्थापना 1976,
- मुख्यालय अकोला
- दर्जेदार शेती बियाणे रास्त भावात शेतकऱ्यांना पुरविते.
- महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA)
- स्थापना 1976,
- कार्य सुरु – 1977,
- मुख्यालय मुंबई
- महाराष्ट्रात गृहबांधणी करते. गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी कार्यकरते.
- महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ (MELTRON)
- स्थापना 1978
- मुख्यालय मुंबई
- महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक उद्योगांच्या वाढीसाठी कार्य करते,
- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित (MPBCDC) Ltd)
- स्थापना 1978,
- मुख्यालय मुंबई
- मागासवर्गीयांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करणे
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी आणि शेळी विकास महामंडळ /
- स्थापना 1978,
- प्रत्यक्ष कार्य सुरु – 1979,
- मुख्यालय पुणे/
- शेळी, मेंढी यांच्या प्रजातींचा विकास व त्यांच्या पालनासाठी गरजू पशुपालकांना मदत करते. त्यासाठी विविध योजना राबविते.
- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED)
- स्थापना 1985,
- मुख्यालय औरंगाबाद
- उदयोजक घडविण्यासाठी कार्य करते. उद्योजक हे मराठी मासिक चालविते.
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित
- स्थापना – 1985,
- मुख्यालय मुंबई
- राज्यातील दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मदत व अर्थसहाय्य करते.
- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित (MSRDC Ltd)
- स्थापना – 1996,
- मुख्यालय मुंबई
- महाराष्ट्रातील रस्ते, पुल बांधणी व विकास यासाठी कार्य करते.
- महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ
- स्थापना 1996.
- मुख्यालय पुणे
- कृष्णा खोऱ्यातील पाटबंधारे, धरणे यांचे बांधकाम व विकास यासाठी कार्य करते.
- विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
- स्थापना 1997,
- मुख्यालय नागपूर
- विदर्भातील पाटबंधारे, धरणे यांचे बांधकाम व विकास यासाठी कार्य करते.
- कोकण पाटबंधारे विकास महामंडळ
- स्थापना 1997,
- मुख्यालय – ठाणे
- कोकणातील पाटबंधारे, धरणे यांचे बांधकाम व विकास यासाठी कार्य करते.
- तापी पाटबंधारे विकास महामंडळ
- स्थापना – 1997,
- मुख्यालय जळगांव
- खानदेश (धुळे, नंदूरबार, जळगांव) मधील पाटबंधारे, धरणे यांचे बांधकाम व विकास यासाठी कार्यरत.
- गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ
- स्थापना 1998,
- मुख्यालय औरंगाबाद
- मराठवाड्यातील पाटबंधारे, धरणे यांचे बांधकाम व विकास यासाठी कार्यरत.
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP))
- स्थापना 1997,
- मुख्यालय मुंबई
- जलशुध्दीकरण, पाणीपुरवठा व मलनिस्सारण यासाठी कार्य करते.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
- स्थापना 1998,
- मुख्यालय मुंबई
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व ज्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा मराठा व बाकी तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबविते.
- मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित
- स्थापना 2000,
- मुख्यालय मुंबई
- अल्पसंख्यांकाच्या आर्थिक विकासासाठी, स्वयंरोजगार योजना राबविते.
- महाराष्ट्र कृषी आणि फळ प्रक्रिया महामंडळ मर्यादित (MAFCO Ltd)
- स्थापना 2004,
- मुख्यालय मुंबई
- कृषीप्रक्रिया, फळप्रक्रिया उद्योग चालवत असे.
- 31 जुलै 2017 पासून बंद केले गेले. त्यास पुन्हा सुरु करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे.
टीप.. हया बद्दल अधिक माहिती या पेज वर ऍड केली जाईल त्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट देत रहा अथवा साईट वर Notification Allow करा..
1 thought on “महाराष्ट्र शासनाची विविध महामंडळे । maharashtra mahamandal | maharashtra mahamandal best info 2021 |”